Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

जागतिक मैत्री दिनानिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सहकारी फेडरेशन यांच्यात मैत्रीपूर्ण सहकार्याची नवी दिशा

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

जागतिक मैत्री दिनानिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सहकारी फेडरेशन यांच्यात मैत्रीपूर्ण सहकार्याची नवी दिशा

गोकाक (कर्नाटक) : ३ ऑगस्ट या जागतिक मैत्री दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व कर्नाटक राज्य सहकारी फेडरेशन यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने एक महत्त्वपूर्ण अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या नेतृत्वाखालील महासचिव शशिकांत राजोबा, व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी कर्नाटक राज्यातील गोकाक येथे भेट दिली.

प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक डॉ. संजय होजमठ यांनी केले. भेटीदरम्यान दोन्ही राज्यांतील सहकार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आणि अनुभवांची देवाण घेवाण साधण्यासाठी विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार असल्याचे राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी सांगितले.

तसेच या अभ्यास दौऱ्यादरम्यान एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे ‘इंटरनॅशनल को – ऑप.इयर’ निमित्त गोकाक येथे एक आंतरराज्यीय सहकारी परिषद (Interstate Co – op. Conference) घेण्यात येणार आहे. यासोबतच, “पर्यटनातून प्रशिक्षण” या अभिनव संकल्पनेतून महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे कार्यकर्ते गोकाक येथे अभ्यास दौरा करतील.

या दौऱ्याचा आणखी एक विशेष भाग म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दिला जाणारा “दीपस्तंभ पुरस्कार” या वर्षी गोकाक येथील निसर्गरम्य परिसरात, प्रति-नायगारा फॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याच्या सान्निध्यात प्रदान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दीपस्तंभ पुरस्कार सोहळा अधिक प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरणार आहे.

गोकाक दौऱ्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील प्रतिनिधी कर्नाटकातील सहकारी व्यवस्थापनातील आदर्श उपक्रमांचा अभ्यास करतील. उडलगी या केवळ ३० हजार लोकसंख्या असलेल्या व “सहकार ग्राम” म्हणून ओळख मिळविलेल्या गावाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी जाणार आहे. या गावात ६५ सहकारी पतसंस्था कार्यरत असून, त्या गावातील नागरिकांना पतपुरवठा करून अर्थसहाय्य करत आहेत. येथे “सहकारांतर्गत सहकार” या तत्त्वावर चालणारी सहकारी पतसंस्थांची चळवळ महाराष्ट्रातील पतसंस्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

याशिवाय, कर्नाटकमधील सर्वात मोठी सहकारी पतसंस्था असलेल्या वीरेश्वर को – ऑप. मल्टीस्टेट सोसायटी आणि इतर आदर्श सहकारी पतसंस्थांना भेट देण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला. या भेटींमधून पतसंस्थांच्या कार्यपद्धती, वित्तीय धोरणे आणि नवाचार यांचा सखोल अभ्यास करण्यात येईल. हा अभ्यास दौरा दोन्ही राज्यांतील सहकार चळवळीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार असून, परस्पर आदान प्रदानाच्या माध्यमातून नव्या संधींचा मार्ग खुला होईल, अशी अपेक्षा राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांनी व्यक्त केली.

या वेळी कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष धरेप्पा एम. आलगुर, संचालक तमन्ना बलप्पा केंचरेड्डी, जितेंद्र बी. मंगळेकर आदींसह कर्नाटक फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे