Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

अकोले नगरीत सहकार दिंडीने केला सहकाराचा जागर ; काका कोयटे‌ यांच्या कुशल नेतृत्वामुळे पतसंस्था चळवळ मजबूत – मधुकरराव नवले

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 8 0 2 2

अकोले नगरीत सहकार दिंडीने केला सहकाराचा जागर ; काका कोयटे‌ यांच्या कुशल नेतृत्वामुळे पतसंस्था चळवळ मजबूत – मधुकरराव नवले

अकोले : सहकारी पतसंस्था सर्वसामान्य जनतेचा मोठा आधार असून, सहकारी पतसंस्थांशी जनतेचे घट्ट नाते निर्माण झाले आहे. सहकारी पतसंस्थांमुळे गोरगरिबांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य व समृद्धी आली आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीला काका कोयटे‌ यांच्यासारखे दृष्टे व कार्यक्षम व कुशल नेतृत्व लाभल्याने पतसंस्था चळवळीला नवी दिशा मिळाली आहे. असे प्रतिपादन अकोले येथील बुवासाहेब नवले मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित सहकार चळवळीचे जनक स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचे बुधवारी (५ फेब्रुवारी) सायंकाळी अकोले (जि. अहिल्यानगर) येथे आगमन झाले. सहकार विभाग, अकोले तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन व तालुक्यातील पतसंस्थांच्या वतीने या दिंडीचे जल्लोषात व उत्साहात स्वागत करण्यात आले.

येथील अगस्ती विद्यालयात सहकार दिंडीचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) अमोल वाघमारे, अकोले तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भाऊ पाटील नवले, बुवासाहेब नवले मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष मधुकरराव नवले, अगस्ती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव देशमुख, दूधगंगा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन चासकर आदींनी दिंडीचे उत्साहात स्वागत करून पालखीचे पूजन केले. नंतर जय सहकार, पतसंस्था चळवळीचा विजय असो अशा विविध घोषणा देत शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरून बुवासाहेब नवले क्रेडिट सोसायटीच्या प्रांगणात आल्यानंतर विविध मान्यवरांनी दिंडीतील पालखीचे पूजन केले.

शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक जोंधळे, लक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण माळुंजकर, महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन शिंदे, लिंगेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर फापाळे, राजीव गांधी पतसंस्थेचे अध्यक्ष शेटे, विवेकानंद पतसंस्थेचे बाळासाहेब आंबरे, अर्थवेद पतसंस्थेचे बी. एम. महाले, स्वामी समर्थ पतसंस्थेच्या मंगला तळपाडे, महिला ग्रामीण पतसंस्थेच्या श्रीमती हांडे, प्रवरा पतसंस्थेचे भास्कर मंडलिक, अकोले पतसंस्थेचे नंदूशेठ मैड, धनश्री पतसंस्थेचे विलास आरोटे, बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या संचालिका मंदाताई नवले, तालुका फेडरेशनचे व्यवस्थापक आर. एम. धुमाळ, नवनाथ भोर, आत्माराम रंधे यांच्यासह अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, राजीव गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था आदी तालुक्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी तसेच सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

महिलांनी दिंडीत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. टाळ, मृदंग वाजवत “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात सुंदर पावल्या खेळणाऱ्या बाल वारकऱ्यांनी आणि पतसंस्थांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गीतांवर सुंदर नृत्य सादर करणाऱ्या कलावंतांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी मधुकरराव नवले म्हणाले, स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ, स्व. वैकुंठभाई‌ मेहता, पद्मश्री स्व. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासारख्या समाज धुरिणांनी महाराष्ट्रात सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. लोकनेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले. महाराष्ट्रातील सहकार चळवळ देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरली आहे. शेतकरी, लघुउद्योजक व सर्वसामान्य माणसांना गरजेच्या वेळी अर्थसहाय्य करणाऱ्या पतसंस्थांचे सहकार चळवळ वाढविण्यात मोलाचे योगदान आहे.

भाऊ पाटील नवले म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघाने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले असून, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी फेडरेशनच्या वतीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्याअंतर्गत येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच पतसंस्थांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी मुंबई आणि नागपूरपासून शिर्डीपर्यंत दोन सहकार दिंड्यांचे आयोजन केले आहे.

तसेच या दिंड्यांमुळे‌ सर्वत्र पतसंस्था चळवळीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत पतसंस्था चळवळ मजबूत करण्याच्या दृष्टीने मंथन करून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. या परिषदेत पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

पतसंस्था चळवळ वाढीस लागावी म्हणून सहकार विभाग प्रयत्नशील असून, पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे यांनी सांगितले. या वेळी तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार दिंडीचे नियोजक नेटविन सॉफ्टवेअर कंपनीचे मसूद अत्तार, शिवकृपा पतपेढीचे दयानंद इथापे व इतरांचा सत्कार करण्यात आला.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 8 0 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा