Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ राज्यातील अर्थकारणाला दिशा देणारी – आ. सुधीर गाडगीळ ; सांगलीमध्ये सहकार दिंडीचे धुमधडाक्यात स्वागत

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 3 8 1 5

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ राज्यातील अर्थकारणाला दिशा देणारी – आ. सुधीर गाडगीळ ; सांगलीमध्ये सहकार दिंडीचे धुमधडाक्यात स्वागत

सांगली : सांगली जिल्ह्याला सहकाराची मोठी उज्ज्वल परंपरा असून या भागातील सहकारी संस्थांनी केलेले काम इतरांसाठी आदर्शवत आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ राज्यातील अर्थकारणाला दिशा देणारी चळवळ आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांनी केले.

वित्तीय कंपन्या सोने तारण कर्ज व मायक्रो फायनान्सच्या‌ माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेची अडवणूक करत आहेत. जादा व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध “पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स” या सुवर्णपेढीचे सर्वेसर्वा आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांनी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनसोबत एक करार करून जे ग्राहक “पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स” मधून सोने खरेदी करतील त्यांना आम्ही कर्ज देऊ, असे प्रतिपादन काका कोयटे‌ यांनी केले असता, आ. गाडगीळ यांनी त्यास सहमती दर्शवली आणि लवकरच याबाबत एक बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. – काका कोयटे, अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकार परिषदेनिमित्त काढण्यात आलेल्या सहकारमहर्षि स्व.डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडीचे “सहकाराची पंढरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली शहरात फुलांचा वर्षाव करीत तुतारीच्या निनादात व ढोल- ताशांच्या गजरात रविवारी अभूतपूर्व जल्लोषात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयापासून “जय सहकार”च्या घोषणा देत सांगली शहरातून विराट रॅली काढण्यात आली. आ.सुधीर (दादा) गाडगीळ यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पृथ्वीराज (बाबा) पाटील, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा, उपकार्याध्यक्ष चंद्रकांत वंजारी, स्वीकृत संचालक संदीप माळी, बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, सहकार भारतीचे प्रदेश संपर्कप्रमुख संजय परमणे‌, सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ए. डी. पाटील, चार्टर्ड अकाउंटंट श्रीगोपाळ सारडा, वीराचार्य पतसंस्थेचे अध्यक्ष अजितकुमार भंडे, उपाध्यक्ष अरुण पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, सहाय्यक निबंधक विजय गोधकर, उल्हास मधाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आ‌.‌ सुधीर (दादा) गाडगीळ व काका कोयटे यांच्या हस्ते सहकार रथाचे पूजन व सहकाराच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सहकार ज्योत व दीप प्रज्वलन व डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील, उपाध्यक्ष डॉ.अशोकराव सकळे व संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले.

काका कोयटे म्हणाले की, महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा लाभलेली असून राज्यातील पतसंस्था चळवळ जगातील सर्वात मोठी पतसंस्था चळवळ आहे. सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातील पतसंस्थांचा अभिमान आहे. महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीची प्रतिष्ठा व सर्वसामान्य जनतेचा पतसंस्थेवरील विश्वास वाढविण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनने सहकार दिंडी त्याचबरोबर येत्या ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील व परदेशातील सहकार कायदे, पतसंस्थांची कार्यप्रणाली व इतर विविध विषयांवर परिषदेत विचार मंथन होऊन महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या परिषदेत उपस्थित राहावे. सहकार दिंडीला राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळत असून त्यामुळे पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

आ. सुधीर (दादा) गाडगीळ, पृथ्वीराज (बाबा) पाटील व इतर वक्त्यांनी काका कोयटे यांच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा करून सहकार दिंडीला मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शशिकांत राजोबा यांनी पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

कार्यक्रमानंतर कर्मवीर पतसंस्थेपासून सहकाराच्या रथासह भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीच्या मार्गावर सुभाष मगदूम शिवशक्ती नागरी पतसंस्थेतर्फे अध्यक्ष श्रीकांत मगदूम,उपाध्यक्ष गंगाधर आंबोळे, सी. ए.माळी तर जनता सहकारी बँक लि. (पुणे) च्या सांगली शाखेतर्फे रोहित जोशी, स्वाती सावळवाडे,निखिल दातार, सिद्धार्थ देशपांडे यांनी काका कोयटे व अन्य मान्यवरांचे स्वागत केले.

या रॅलीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था, वीराचार्य पतसंस्था, सांगली अर्बन बँक,सांगली सॅलरी ओनर्स क्रेडिट सोसायटी,अभ्युदय पतसंस्था, सांगली, सांगली ट्रेडर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, विटा अर्बन क्रेडिट सोसायटी,बालाजी अर्बन सोसायटी, विटा, जनसेवा अर्बन सोसायटी,कुंडल, शरद मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, वाठार स्टेशन,जनसेवा महिला अर्बन सोसायटी, पलूस,तासगाव तालुका शिक्षक सेवक पतसंस्था, बोरगाव, शारदा महिला पतसंस्था, विटा, सैनिक क्रेडिट सोसायटी, आरवडे सिद्धेश्वर नागरी पतसंस्था आरवडे, सुयोग पतसंस्था, बलगडे, अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था, पेड, ता. तासगाव अशा विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक,अधिकारी व कर्मचारी हातात सहकाराचा झेंडा व विविध घोषणांचे फलक व गळ्यात सहकाराचे प्रतीक असलेले मफलर घालून सहकाराचा जागर करीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली कर्मवीर पतसंस्थेच्या मुख्यालयात परतल्यानंतर तेथे विसर्जित झाली व नंतर सहकार दिंडी साताऱ्याकडे मार्गस्थ झाली.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 3 8 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे