Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून विकलांग व दिव्यांगांना जयपूर फूट उपलब्ध करून देणार – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 7 8 9 9

सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून विकलांग व दिव्यांगांना जयपूर फूट उपलब्ध करून देणार – काका कोयटे, अध्यक्ष

पैठण : महाराष्ट्र राज्यातील सहकारी पतसंस्था सामाजिक कामात नेहमीच अग्रभागी राहून व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे काम करत असतात. शालिवाहन पतसंस्थेने देखील विकलांग व दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात – पाय (जयपुर फूट) वितरित करून राज्यातील इतर सहकारी पतसंस्थांना एक आदर्श निर्माण करून दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून किमान १० हजार विकलांग व दिव्यांगांना साधू वासवानी मिशन यांच्या माध्यमातून व सहकार्याने मोफत कृत्रिम हात – पाय (जयपुर फूट) उपलब्ध करून देणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त पैठण येथील शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था व साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कृत्रिम हात – पाय (जयपूर फूट) वितरण पैठण विधानसभा आमदार विलास बापू भुमरे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, शालिवाहन सारख्या पतसंस्था स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचे काम करतात. खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांऐवजी सहकार खात्याच्या निकषांचे तंतोतंत पालन करणाऱ्या शालिवाहन सारख्या सक्षम पतसंस्थांमध्ये जनतेने आपल्या ठेवी ठेवाव्यात.

तसेच ज्या प्रमाणे शालिवाहन राजाने मातीच्या खेळणींना पाणी शिंपडून जिवंत केले. त्याच प्रमाणे दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात व पायांचे बळ देऊन त्यांचे आयुष्यात जिवंतपणा आणणारे शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण हे खऱ्या अर्थाने शालिवाहन राजाचे वंशज आहेत. सहकाराच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामात शालिवाहन पतसंस्था अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी काढले.

या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे महासचिव डॉ.शांतीलाल शिंगी, महानंद दूध चे संचालक नंदलाल काळे, सहायक निबंधक बलराम नवथर, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण यांनी केले. साधू वासवानी मिशन चे सुंदरलाल वासवानी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, साधू वासवानी मिशन चे माध्यमातून १५ वर्षात ४२००० कृत्रिम हात व पायांचे वितरण केले पण कधी दिव्यांग बांधवांना रडतांना पाहिले नाही. दुसऱ्याचा आधार घेऊन चालत येतात पण जाताना मात्र स्वतःच्या पायाने चालत जातात हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे.

या कार्यक्रमासाठी शालिवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ.जयंत जोशी, मानद सचिव प्रकाश कासलीवाल, संचालक दीपक आहुजा, गणेश लोहिया, दीपक लखमले, डॉ.पंडित किल्लारीकर, बाबासाहेब राऊत, सुनील शेळके, अँड. राजेंद्र गोर्डे, सुमनताई मस्के, वैजापुर शाखेचे सल्लागार कमलाकर साबने, वाळूज चे सल्लागार महेंद्रसिंग ठाकुर, धोंगडे नाना तसेच डॉ. कपिल पहाडे, अमित दाभाडे, प्रवीण घुगे, रामेश्वर मुंदडा, जगन्नाथ परदेशी, एकनाथ पटेल, शशिकलाताई भोसले, रविंद्र जोशी, रेवन्नाथ खेडकर, वसंत गोरे, राधेशाम लाखोटीया, अशोक बर्डे, उमेश तट्टू, संजय कस्तुरे आदींसह मोठ्या संख्येने शालिवाहन चे सभासद, ठेवीदार, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन किरण गाडेकर यांनी केले तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य अधिकारी शिवाजी घोडसे, मुख्य वसूली अधिकारी रामदास संदलसे, देवीदास पुरणपात्रे, व्यवस्थापक अझरोद्दीन शैख, ज्ञनेश्वर मानधरे, सूरज शंकरे, जनसंपर्क अधिकारी नरेश सिकची, श्रीनिवास गोसावी, परीक्षित गोसावी, पैठण शाखा व्यवस्थापक भारत कोंगे, सुरेश लघाणे, ज्ञानेश चौहन, तृप्ति गुरव, अरुणा पिल्लई, प्रीतम घोडके, अश्विनी सोरमारे, उज्वला म्हस्के, राहुल नवगिरे, व सर्व शालिवाहन परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

1.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 7 8 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा