Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचा नागपुरात मोठ्या उत्साहात शुभारंभ

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 4 7 9 8

वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचा नागपुरात मोठ्या उत्साहात शुभारंभ

नागपुर : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने येत्या ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिर्डी येथील राज्य फेडरेशनच्या संशोधन व प्रशिक्षण मंदिरात आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली आहे.

स्व.वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने नागपूरहून निघालेली दिंडी क्र.२ ही वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, चिखली, जालना, छत्रपती संभाजी नगर मार्गे धाराशिव, बीड, जिल्ह्यातून अहिल्यानगरकडे येईल. आशिया खंडातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना काढणारे पद्मश्री स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या लोणी (प्रवरानगर) येथे ६ फेब्रुवारीला दिंडी क्र.१ व दिंडी क्र.२ या दोन्ही दिंड्यांचा संगम होणार आहे – काका कोयटे, अध्यक्ष

त्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन सहकार दिंड्यांचे आयोजन करण्यात आले असून, सहकारमहर्षी स्व.वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने काढण्यात येणाऱ्या दिंडी क्र.२ चा बुधवारी (२९ जानेवारी) नागपूर येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व नागपूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांच्या शुभ हस्ते आणि गोविंद अर्बन को – ऑप. सोसायटी अध्यक्ष व नागपूर विधानपरिषद आमदार अभिजीत वंजारी व गांधीबाग सहकारी बँक अध्यक्ष रवींद्र दुरुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

सकाळी साडे नऊच्या सुमारास श्री गजानन मंदिर, लकडापूल, महाल, नागपूर येथून ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात सहकाराचा ध्वज उंचावत “जय सहकार” च्या घोषणा देत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या दिंडीचे ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी साकारलेल्या सुंदर रांगोळ्या, पतसंस्था चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या पतसंस्थांच्या चित्ररथाबरोबर राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा सहकार चळवळीत असणारा सहभाग व सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारे आकर्षक चित्ररथ, सहकार क्षेत्रातील मान्यवरांसह सहकारी पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग हे या दिंडीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे समन्वयक राजूदास जाधव, संचालिका नीलिमाताई बावणे, तज्ज्ञ संचालक हरिभाऊ किरपाने, सुदर्शन भालेराव, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे, नागपूर जिल्हा सहकार आघाडी अध्यक्ष किशोर भागडे, उपाध्यक्ष शशांक डोंगरवार, महामंत्री भाग्यलता तलखंडे, संपर्क प्रमुख श्रुती देशपांडे, शिक्षक सहकार आघाडी अध्यक्ष योगेश बन, नागपूर जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष अशोक धापोडकर आदींसह नागपूर जिल्हा व आजूबाजूच्या परिसरातील पतसंस्थांचे संचालक, सभासद, ठेवीदार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

2.5/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 4 7 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा