Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था या सर्वसामान्यांचा आधार असून राज्य फेडरेशन व कोल्हापूर जिल्हा फेडरेशन त्यांना आधार देण्याचे काम करत आहे – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था या सर्वसामान्यांचा आधार असून राज्य फेडरेशन व कोल्हापूर जिल्हा फेडरेशन त्यांना आधार देण्याचे काम करत आहे – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था या सर्वसामान्यांचा खरा आधार असून या पतसंस्था टिकल्या पाहिजेतच नव्हे तर अधिक बळकट झाल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन त्यांना आधार देण्याचे काम करत आहे. राज्य शासनाच्या स्तरावर मी देखील सातत्याने प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा, कोल्हापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचा रौप्य महोत्सवी सोहळा, पुरस्कार वितरण व भेटवस्तू वितरण सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषवले.

अध्यक्षीय मनोगतात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, “कोल्हापूर जिल्हा फेडरेशन ही महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे अंशदानाचा प्रश्न असो किंवा सहकारी पतसंस्थांचे इतर कोणतेही प्रश्न असोत, त्यांचे सकारात्मक निवारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

 

तसेच “आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नेहमीच सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांवर शासनाकडे ठाम आवाज उठवला आहे. पतसंस्थांच्या ठेवीना विमा संरक्षण मिळावे, तसेच जाचक कायद्यांत बदल व्हावेत यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत,” अशी अपेक्षा काका कोयटे यांनी व्यक्त केली.

प्रमुख पाहुणे प्रकाश आबिटकर म्हणाले की, “महाराष्ट्राची पतसंस्था चळवळ ही सर्वसामान्यांना आधार देणारी चळवळ आहे. या चळवळीला बळकटी मिळावी यासाठी मी विधिमंडळ व कॅबिनेट बैठकीत सहकारी पतसंस्थांचा आवाज मांडत आहे. सहकारी पतसंस्थांकडून अंशदान वसूल करणे हा अन्यायकारक निर्णय आहे. मी विधिमंडळात असलो तरी, या निर्णयास कायम विरोध करीन. तसेच कोल्हापूर जिल्हा फेडरेशन व राज्य फेडरेशन यांनी सुचविलेल्या विमा ठेव संरक्षण या योजनेचा मी वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून ती योजना शासनाकडून मंजूर करून घेईन.”

कोल्हापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष शंकर पाटील यांनी जिल्हा फेडरेशनच्या कार्याचा आढावा देत प्रशिक्षण केंद्र मंजूर करणे, नाममात्र सभासदांशी व्यवहार करण्याची परवानगी देणे आणि अंशदान रद्द करणे या मागण्या केल्या.

प्रसंगी जिल्हा फेडरेशनच्या सहकारी पतसंस्था चळवळीतील मच्छिंद्र मुरुडकर, सुनिल नांगावकर, प्रफुल्ल यादव, आदिनाथ किणींगे, सुधाकर पिसे, हाजगुळकर यांनी मनोगत व्यक्त करून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना करत असलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार मानत राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या पाठीशी सदैव राहणार असल्याचे सांगितले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्याध्यक्ष अनिल पाटील यांनी केले, विषयपत्रिका वाचन व्यवस्थापक दीपक पाटील यांनी केले. अध्यक्ष शंकर पाटील व उपाध्यक्ष मोहनलाल माळी यांनी आभार मानले. सुत्रसंचालन मधुकर पाटील यांनी केले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे