साडे चार कि.मी.पायी चालत व अडीच तास चालली श्रीरामपूर मध्ये स्व.वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

साडे चार कि.मी.पायी चालत व अडीच तास चालली श्रीरामपूर मध्ये स्व.वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी
श्रीरामपूर : आज गुरुवारी श्रीरामपूर येथे सकाळी १० वा.दाखल झालेली स्व.वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी मेनरोड, शिवाजी रोड मार्गै अपूर्वा हाॅल येथे सांगता समारंभ करुन लोणीकडे रवाना झाली. अडीच तास चाललेली दिंडी व पालखीची मिरवणुकी बरोबर साडे चार किलोमिटर वाजत गाजत ३०० पेक्षा जास्त महिला व पुरुष सहभागी झाले होते.
तसेच सहाय्यक निबंधक श्री.संदिप रुद्राक्ष व सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी ही पुर्णवेळ दिंडीत सहभागी होते. श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पतसंस्थानी यात १०० टक्के सहभाग तर नोंदवलाच या शिवाय तालुक्यातील विकास सोसायट्यांचेही प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले होते. सर्वांना फेटे बांधलेले होते. ढोल ताशांचा गजर,चौकाचौकात पुष्पवृष्टी, फटाकड्यांच्या लडी, प्रत्येक चौकात महिला व पुरुष उत्साहाने फुगडी खेळत, नाचत नाचत दिंडीत सहभागी होत होते.अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक व श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील पतसंस्था चळवळ एकसंध व एकत्रीत पणे काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे हे दयोतक आहे असे तालुका फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री.अनिरुध्द महाले यांनी यावेळी सांगितले.
श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पतसंस्थाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक या दिंडीत उत्साहाने सामील झाल्यामुळे दिंडी भव्य दिव्य झाल्याची माहिती तालुका फेडरेशनचे संचालक साहेबराव वाबळे व संजय गोरे यांनी दिली. समिरभाई बागवान यांनी दिंडीचे नियोजनात सुसुत्रता आणली. अमोल जोशी, दिगंबर कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची आखणी केली होती.
या दिंडीत करणदादा ससाणे, सिध्दार्थ मुरकुटे, सचिन गुजर, सौ.सुशिला नवले, सौ.विदया काळे, रविंद्र खटोड, रक्ताटे सर, अरुण पाटील नाईक , मधुकर सातव, याकुबभाई बागवान, सोमनाथ लोखंडे, भुषण साठे, राधिका पवार, प्रविण लुंक्कड, अशोक राशिनकर, शेषराव पवार, श्री.साठे, अशोक थोरे, श्रीनिवास बिहाणी सहभागी झाले होते.