Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

कोपरगावात सहकार दिंडीचे अभूतपूर्व जल्लोषात स्वागत, ढोल – ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक – काका कोयटे‌, अध्यक्ष ; आ.आशुतोष काळे, विवेकभैय्या कोल्हे व परदेशी पाहुण्यांसह पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 2 7 9 9 8

कोपरगावात सहकार दिंडीचे अभूतपूर्व जल्लोषात स्वागत, ढोल – ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक – काका कोयटे‌, अध्यक्ष ; आ.आशुतोष काळे, विवेकभैय्या कोल्हे व परदेशी पाहुण्यांसह पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती

सहकारी पतसंस्था चळवळीच्या वाढीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे काका कोयटे यांच्यासह त्यांच्या पत्नी सुहासिनी कोयटे, सुपुत्र संदीप कोयटे, स्नुषा स्वाती कोयटे, नातू ईशान कोयटे यांनी या दिंडीत सहकाराची पालखी स्वतःच्या खांद्यावरून मिरवली. यानिमित्ताने कोयटे घराण्याची तिसरी पिढी सहकारी पतसंस्था चळवळीत सक्रिय झाल्याचे दिसून आले. ही दिंडी समता पतसंस्थेनजीक येताच काका कोयटे, शशिकांत राजोबा, उदय जोशी, सुहासिनी कोयटे, अंजली पाटील, भारती मुथा, पूनम जगदाळे यांच्यासह खास परदेशातून आलेल्या नेनिता मलबस,नागपी व्हिझेल, सॅलरी बोटेंगन (फिलीपिन्स), पालामुरा यशोदा (श्रीलंका) चंद्र प्रसाद ढकाला, शिवाजी सपकोटा (नेपाळ) व इतर पतसंस्था चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी चला पतसंस्थेला जाऊ, दिंडी चालली सहकाराची, सहकाराचा पांडुरंग अशा विविध गीतांवर ठेका धरत सुंदर नृत्य केले.

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेनिमित्त फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सहकार महर्षी स्व.डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार आणि स्व. वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे कोपरगाव येथे शुक्रवारी फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशाच्या गजरात प्रचंड उत्साहात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या वेळी “जय सहकार” च्या घोषणा देत शहरातून वाजत गाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली.

आ.आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, सहायक निबंधक (सहकारी संस्था) नामदेव ठोंबळ यांच्यासह सहकार विभाग, पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या दिंडीचे उत्साहात स्वागत केले. तसेच दिंडीतील पालखीचे पूजन करून स्वतःच्या खांद्यावरून पालखी मिरवली. सहकार दिंडीच्या स्वागतासाठी काढलेली भव्य दिव्य मिरवणूक कोपरगावकरांच्या कायम लक्षात राहील अशीच होती.

राज्य पतसंस्था फेडरेशनने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त काढलेल्या दोन सहकार दिंड्यांनी पतसंस्था चळवळीबाबत जनजागृती केली. या दिंडीसोबत फिरून मी महाराष्ट्र पिंजून काढला. सहकार खाते हे आमचे माय – बापाच्या भूमिकेत आहे. आम्ही त्यांचे लेकरू म्हणून आमच्या विविध प्रश्नांबाबत सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर आक्रोश करणार आहोत. यंदाच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार खाते व सहकारी पतसंस्थांनी एकत्र येऊन काम केले तर महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ जगात पहिल्या क्रमांकावर येईल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोपरगाव ही माजी सहकारमंत्री स्व.शंकराव काळे साहेब व स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची कर्मभूमी आहे.आज काळे घराण्यातील आमदार आशुतोष काळे व कोल्हे घराण्यातील विवेकभैय्या कोल्हे यांनी सहकार दिंडीचे स्वागत केले आणि कोपरगाव तालुक्यासह महाराष्ट्रातील सहकार चळवळ वाढली पाहिजे यासाठी एकोप्याची भूमिका घेतली याचा आम्हाला विशेष आनंद आहे – काका कोयटे, अध्यक्ष

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व शिर्डी येथे ८ व ९ फेब्रुवारीला आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेनिमित्त राज्य पतसंस्था फेडरेशनने मुंबई ते शिर्डी सहकार महर्षी स्व. डॉ. धनंजयराव गाडगीळ सहकार दिंडी व नागपूर ते शिर्डी सहकारमहर्षि स्व. वैकुंठभाई मेहता सहकार दिंडी अशा दोन सहकार दिंड्यांचे आयोजन केले होते. ६ फेब्रुवारीला दुपारी प्रवरानगर (लोणी) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृती स्थळावर या दोन्ही दिंड्यांचा संगम झाला. तेथून राहाता, शिर्डी मार्गे या दोन्ही दिंड्या शुक्रवारी दुपारी ४ वाजता कोपरगावात दाखल झाल्यानंतर कोपरगावातील गोदाकाठच्या श्री स्वामी समर्थ मंदिरापासून बिरोबा चौक, महात्मा गांधी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा, बस स्थानक मार्गे समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक वसंतराव शिंदे, महासचिव शशिकांत राजोबा, उपाध्यक्ष डॉ.शांतीलाल शिंगी, उपकार्याध्यक्ष सुरेश पाटील, चंद्रकांत वंजारी, नारायण वाजे, ॲड.अंजली पाटील, समन्वयक राजुदास जाधव, सहसचिव शरद जाधव, भास्कर बांगर, भारती मुथा, संचालक वासुदेव काळे धनंजय तांबेकर, रवींद्र भोसले, सुदर्शन भालेराव, माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, कोपरगाव तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे, पोहेगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन औताडे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र झावरे, शिवसेनेचे शिवाजी ठाकरे, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, शिवकृपा सहकारी पतपेढीच्या संचालिका पूनम जगदाळे, समता पतसंस्थेच्या उपाध्यक्षा श्वेता अजमेरे, संचालक संदीप कोयटे, संचालक जितेंद्र शहा, अरविंद पटेल, गुलाबचंद अग्रवाल, चांगदेव शिरोडे, रामचंद्र बागरेचा, गुलशन होडे, निरव रावलिया, कचरू मोकळ, शोभा दरक सरव्यवस्थापक सचिन भट्टड, समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे, नेटविन कंपनीचे उपाध्यक्ष मसूद अत्तार, संदीप वहाडणे उपस्थित होते.

तसेच समता पतसंस्था, शरद पवार पतसंस्था, संजीवनी पतसंस्था, धनश्री पतसंस्था, माधवराव आढाव पतसंस्था, अरिहंत पतसंस्था, कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा पतसंस्था, सुधन गोल्ड लोन, अलंकार पतसंस्था, भाग्यलक्ष्मी पतसंस्था, शुभम पतसंस्था, महात्मा फुले पतसंस्था, सहकार महर्षी शंकराव कोल्हे साखर कारखाना कामगार पतपेढी, कुलस्वामिनी पतसंस्था, सिद्धलक्ष्मी पतसंस्था, मुंबादेवी पतसंस्था, संत जनार्दन स्वामी पतसंस्था, भारतीय पतसंस्था, मंदावी पतसंस्था, बालाजी पतसंस्था, एकता पतसंस्था, रयतलक्ष्मी पतसंस्था आदींसह विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोहेगाव ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन औताडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे संदीप वर्पे, अजित लोहाडे, मनोज अग्रवाल, सुरेंद्र ठोळे, गणेश आढाव, रवींद्र छाजेड, दिनेश दारुणकर, राजेंद्र शिंगी, फुलफगर, भुतडा आदींनी दिंडीचे सहर्ष स्वागत करून मिरवणुकीत सहभाग नोंदवला.

या सहकार दिंडीचे शहरात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दिंडीतील पालखीवर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांनी औक्षण करून दिंडीतील पालखीचे पूजन केले. महिलांनी फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. जय सहकार, अभिमान सहकाराचा, स्वाभिमान पतसंस्थांचा, विना सहकार नाही उद्धार अशा विविध घोषणांनी कोपरगाव नगरी दुमदुमली होती. मिरवणुकीत अग्रभागी पारंपरिक वेशात घोडे व उंटावर स्वार झालेले तरुण सहकाराचा झेंडा डौलाने फडकावत होते. नाशिकचे ढोल ताशा – पथक, पतसंस्थांचे महत्व सांगणाऱ्या गीतांवर सुंदर नृत्य करणारे कला पथक, भजनी मंडळ तसेच आकर्षक फेटे बांधलेले व सहकाराचे प्रतीक असलेले मफलर गळ्यात घातलेले पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकी दरम्यान काका कोयटे व मान्यवरांनी महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 7 9 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा