Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य फेडरेशनच्या पुस्तकांमुळे पतसंस्थांचा पाया भक्कम होणार – संजय होजमठ, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 9 2 8 1

राज्य फेडरेशनच्या पुस्तकांमुळे पतसंस्थांचा पाया भक्कम होणार – संजय होजमठ, अध्यक्ष

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना राज्य फेडरेशनच्या वतीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा संच खरेदी करावयाचा असल्यास महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. ६ पुस्तकांचा एक संच खरेदी केल्यास त्या एकूण किमतीवर २५ टक्के सुट देण्यात येणार आहे. – सौ.सुरेखा लवांडे,
मुख्य कार्यकारी अधिकारी

शिर्डी : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ सुदृढ व भक्कम बनविण्यात राज्य फेडरेशन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्यातील सहकारी पतसंस्था अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त तसेच सहकाराची ओळख, माहिती व ज्ञानाने परिपूर्ण होण्यासाठी राज्य फेडरेशनचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या पुस्तकांच्या संचामुळे सहकारी पतसंस्थांचा पाया भक्कम होणार असल्याचे कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष संजय होजमठ यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने बाळासाहेब पतंगे लिखित पतसंस्थांसाठी मार्गदर्शक पुस्तकांचा प्रकाशन सोहळा कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष संजय होजमठ यांच्या हस्ते व शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथील सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिरात २३ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते.

पुस्तकांच्या संचात ‘गैरव्यवहार कसे शोधाल ? कसे टाळाल?’, ‘सुलभ व सुरक्षित कर्ज वितरण’, ‘यशस्वी सीईओ कसे व्हावे ? अर्थात सहकारी बँकिंग व्यवसायातील विश्वकर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी’, ‘पतसंस्थांसाठी प्रभावी कार्यशैली अर्थात विश्वासाचे खणखणीत नाणी’, ‘सोने तारण आणि लॉकर व्यवस्थापन’, ‘पतसंस्था व्यवसाय वाढीसाठी कर्मचारी व्यवस्थापन’ अशी वेगवेगळ्या प्रकारची, विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, राज्यातील सहकारी पतसंस्थांना राज्य फेडरेशनने पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. या खजिन्यातील एक एक दागिना अनमोल असून मार्गदर्शक देखील आहे. आयुष्यात यश मिळवायचे असेल, तर मार्गदर्शकाची भूमिका महत्त्वाची असते. हा पुस्तकांचा संच सहकारी पतसंस्थांसाठी मार्गदर्शक असून राज्यातील प्रत्येक सहकारी पतसंस्थांनी आपल्या पतसंस्थेच्या मंदिरात हा खजिना ठेवावा.असे आवाहन देखील राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.

प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालक शशिकांत राजोबा, दादाराव तुपकर, सुदर्शन भालेराव, राजूदास जाधव, ॲड. सौ.अंजली पाटील, धनंजय तांबेकर, वासुदेव काळे, भास्कर बांगर, डॉ.रवी भोसले, डॉ. सुरेश पाटील, सौ.भारती मुथा, सुभाष आकरे आदींसह राज्यातील सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार राज्य फेडरेशनचे संचालक राजुदास जाधव यांनी मानले.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 2 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे