Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

सहकार क्षेत्रासाठी ‘कॉर्पोरेट’ दृष्टिकोनाची गरज – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

सहकार क्षेत्रासाठी ‘कॉर्पोरेट’ दृष्टिकोनाची गरज – काका कोयटे, अध्यक्ष

नागपूर, जुलै २०२५ – “सहकार चळवळीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कॉर्पोरेट पद्धतीने चालवण्याची आवश्यकता आहे,” असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले. नागपूर येथे पार पडलेल्या “को-क्रिएट २०२५” या प्रेरणादायी राष्ट्रीय सहकार परिषदेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

काका कोयटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सहकारी संस्थांनी आता हायटेक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून, ‘सहकार बास्केट’ आणि ‘सहकार टॅक्सी’ या संकल्पना विदर्भात यशस्वीपणे राबविल्या जात आहेत.” त्यांनी नमूद केले की, या नवकल्पनांमुळे सहकारी संस्थांचे क्षेत्र विस्तारत असून भविष्यात सहकार क्षेत्राचा विकास निश्चित आहे.

“सहकाराला जर खऱ्या अर्थाने दीर्घकाल टिकवायचे असेल, तर त्याला ‘कॉर्पोरेट’ पद्धतीने संघटित करावे लागेल,” असे मत त्यांनी मांडले. यावेळी त्यांनी ‘Cooperate with Cooperative’ या आदित्य अनघा संस्थेच्या संकल्पनेचे विशेष कौतुक केले. “आदित्य – अनघा संस्थेने सुरुवातीपासूनच ही आधुनिक विचारधारा जोपासली आहे, हे विशेष आनंददायक आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी एका वृत्तपत्रातील मथळ्याचा उल्लेख करत “एक होता सहकार” असे म्हणायची वेळ येऊ नये, कारण सहकार ही चिरकाल चालणारी यंत्रणा आहे,” असे भावनिक आणि विचार प्रवर्तक विधान केले.

काका कोयटे यांनी आपल्या भाषणात सहकार चळवळीतील सुसंस्कृत, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभारावर भर दिला. “सहकारी संस्था म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नव्हे, तर त्या सामाजिक बांधिलकी जपत एकमेकांच्या विकासासाठी काम करतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला देशभरातून सहकार क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत, आणि तरुण नेतृत्व उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ आणि आंतरराष्ट्रीय सहकार दिन या निमित्ताने आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक नव्या कल्पनांना आणि सहकारातील बदलांना दिशा देणारे विचार मांडले गेले.

या कार्यक्रमाला गिरीश गांधी (वनराई फाउंडेशन), सौ.अनघा सराफ (संस्थापक-अध्यक्ष, आदित्य अनघा बँक), राज्य मल्टीस्टेट फेडरेशन अध्यक्ष सुरेश वाबळे, सहकार भारतीचे विवेक जुगादे, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र घाटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे