Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकारी पतसंस्थांच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण आवश्यक – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 1 5 8 9 7

सहकारी पतसंस्थांच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण आवश्यक – काका कोयटे, अध्यक्ष

ठाणे : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ प्रगल्भतेकडे वाटचाल करत असून चळवळीतील पतसंस्था सुरक्षित व प्रगल्भ झाल्या, तर सभासदांचा संस्थेवरील विश्वास अधिक वाढणार आहे. त्यासाठी संस्थेतील प्रत्येक कर्मचारी हा संस्थेच्या प्रत्येक कामात निपुण असणे आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे राज्य पतसंस्था फेडरेशन व विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहकारी पतसंस्थामधील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. कारण सहकारी पतसंस्थांच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण आवश्यक असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे व ठाणे शहर सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित नागरी, पगारदार सहकारी पतसंस्था संचालक व सेवक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.ठाणे शहर सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले.

या प्रशिक्षण वर्गात राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी ‘पतसंस्थांची सद्यस्थिती’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. व्याख्याते ॲड.राजेंद्र नलगे यांनी ‘पतसंस्थांमधील अपहार व उपाय’ , प्रकाश खोपटीकर यांनी ‘वारसाकडून वसूल व कलम १३८’ व ‘एन.पी.ए.’ तर राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी ‘कर्जदार कसा ओळखावा’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक ठाणे शहर सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष किसन बनसोडे यांनी केले. या वेळी उपनिबंधक अविनाश भागवत, ठाणे शहर सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सचिव हणमंत ढाणे , खजिनदार संजय चुंबळे, संचालक संभाजी चौधरी, सतीश माने, राजाराम कोळेकर, शशी सिंह, जालिंदर अहिनवे, शिवाजी पिसाळ, व्यवस्थापक अशोक काळे, वसुली अधिकारी निकेश दुधगावकर आदींसह ठाणे जिल्ह्यातील नागरी, पगारदार सहकारी पतसंस्थांचे २०० प्रतिनिधी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार खजिनदार संजय चुंबळे यांनी मानले.

2/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 8 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे