सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार परिषद विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार परिषद विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचा विशेष अंक महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे मुख पत्र असलेल्या क्रेडिट न्यूज अंकाच्या माध्यमातून राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे. या विशेष अंकाचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सहकाराची गुढी उभारून प्रकाशन करण्यात आले.
प्रसंगी मा. मंत्री महोदयांसोबत सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करून लवकरच मंत्रालयात सहकारी पतसंस्थांच्या या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलविण्यात येईल असे सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे मुखपत्र क्रेडिट न्यूज या मासिकाच्या माध्यमातून राज्यातील सहकारी पतसंस्था सक्षम व सुदृढ बनविण्यासाठी विविध उपक्रम वेगवेगळ्या तज्ञ मार्गदर्शकांच्या लेखाच्या माध्यमातून होत असते.
या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष पद्माकर देशमुख, अहमदपूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी देशमुख, लातूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष गोविंद पुरकर, राजकुमार मजगे उपस्थित होते.



