Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य पतसंस्था फेडरेशन व महाराष्ट्र ऑडिटर्स कौन्सिलने एकत्र येऊन सहकार बळकट करावा – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 4 1 9 3 6

राज्य पतसंस्था फेडरेशन व महाराष्ट्र ऑडिटर्स कौन्सिलने एकत्र येऊन सहकार बळकट करावा – काका कोयटे, अध्यक्ष

पुणे : महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी सहकारातील सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सहकार भारती ज्या पद्धतीने सातत्याने कार्यरत आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र ऑडिटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशननेही पुढाकार घेत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनसोबत हातात हात घालून काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रमाणित लेखापरीक्षक अधिवेशन व कार्यशाळेत काका कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या वेळी व्यासपीठावर सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, सहकार खात्याचे माजी अप्पर आयुक्त व निबंधक एस. बी. पाटील तसेच गृहनिर्माण सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन उपस्थित होते.

काका कोयटे पुढे म्हणाले की, आजच्या बदलत्या आर्थिक व तांत्रिक युगात सहकारी पतसंस्थांना पारदर्शकता, विश्वासार्हता आणि शिस्तबद्ध कारभार यांची अधिक गरज आहे. लेखापरीक्षकांची भूमिका ही केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, संस्थांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना सक्षम बनवण्याची आहे. त्यामुळे ऑडिटर्स आणि पतसंस्था यांच्यात सुसंवाद आणि समन्वय वाढणे ही काळाची गरज आहे.

तसेच सहकार चळवळीसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. डिजिटल व्यवहार, शासनाच्या नव्या धोरणांची अंमलबजावणी, तसेच स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामुळे पतसंस्थांना स्वतःला सतत अद्ययावत ठेवावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, सहकार भारती आणि ऑडिटर्स संघटना यांनी एकत्र येऊन धोरणात्मक नियोजन केल्यास सहकार क्षेत्र अधिक मजबूत होईल.

कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी लेखापरीक्षणातील नवीन बदल, कायदेशीर बाबी आणि संस्थांच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. या अधिवेशनामुळे राज्यातील लेखापरीक्षक आणि पतसंस्था यांच्यात सकारात्मक संवाद निर्माण होऊन सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 9 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे