डॉ.शांतीलाल शिंगी यांच्या नेतृत्वाखाली वर्धमान पतसंस्था महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला अभिमान वाटावा असे काम करत आहे – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

डॉ.शांतीलाल शिंगी यांच्या नेतृत्वाखाली वर्धमान पतसंस्था महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला अभिमान वाटावा असे काम करत आहे – काका कोयटे, अध्यक्ष

छत्रपती संभाजी नगर : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेने एका वर्षात दहा हजाराच्या पुढे टू व्हीलर गाड्यांचे कर्ज वाटप करून शंभर टक्के वसुली केली आहे. हे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीला अभिमानास्पद असून डॉ.शांतीलाल शिंगी यांच्या नेतृत्वाखाली वर्धमान पतसंस्था महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला अभिमान वाटावा असे काम करत असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वर्धमान पतसंस्थेच्या अधिकारी, कर्मचारी आढावा बैठक व अधिकारी, कर्मचारी गौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, “हे यश वर्धमान पतसंस्थेचे नाही, तर संपूर्ण सहकार क्षेत्राचे यश आहे. या संस्थेने अत्यंत व्यवस्थितपणे कर्ज प्रकरणे हाताळली आणि एकही खाते थकलेले नाहीत, हे अत्यंत प्रशंसा करण्यासारखे आहे.”

तसेच “महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय खाजगी कंपन्या ग्राहकांना चढ्या व्याजदराने कर्ज देतात, आणि कर्जाचे काही हप्ते थकल्यावर दमदाटी, अरेरावी आणि हिंसाचार करून वाहने जप्त करतात. परंतु वर्धमान पतसंस्थेचे कर्मचारी हसत मुखाने वसुली करून १००% कर्ज वसूल करतात, हे महाराष्ट्रातील इतर पतसंस्थांनी देखील अनुकरण केले पाहिजे.”

आर्थिक दृष्टिकोनातूनही वर्धमान पतसंस्थेने मोठे यश संपादन केला आहे. मराठवाड्यातील सहकारी पतसंस्थांची पडझड होत असताना, वर्धमान पतसंस्थेने आपल्या ठेवींचा विक्रम केला आहे. ज्या ठेवी ठेवीदारांनी परत घेतल्या होत्या, त्या परत आल्या आहेत, त्याचबरोबर आणखी ठेवींचा वाढीचा आकडा देखील दिसून येत आहे. वर्धमान पतसंस्था ही ठेवीदारांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे ही काका कोयटे यांनी सांगितले.

वर्धमान पतसंस्थेचे मार्गदर्शक आणि सहकार तज्ञ नितीन वाणी यांनी देखील अधिकारी व कर्मचारी यांनी हसतमुख राहून काम करण्याचे महत्त्व सांगितले. “हसतमुख राहून आणि ग्राहकांना आदरपूर्वक सेवा देऊन संस्थेची प्रगती होऊ शकते,” असे ते म्हणाले.

प्रसंगी या वर्षी सर्वाधिक कर्ज प्रकरणे तयार करणाऱ्या आणि एकही हप्ता न थकता वसुली करणाऱ्या वर्धमान पतसंस्थेच्या प्रथम पाच शाखांचा राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी वर्धमान पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, उपाध्यक्ष पद्माकर कदम, संचालक संभाजी राचूरे, अविनाश कोटंबे, मुख्य व्यवस्थापक सौ. माधवी पेचफुले आदींसह संस्थेचे सभासद व नागरिक उपस्थित होते.



