Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

मराठवाड्यातील पतसंस्था चळवळीला नवे बळ ; परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्गदर्शक ठरेल – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 4 1 3 7 8

मराठवाड्यातील पतसंस्था चळवळीला नवे बळ ;
परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्गदर्शक ठरेल – काका कोयटे, अध्यक्ष

परभणी : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील सहकारी पतसंस्थांना दिशा देण्याचे काम परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन करेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केला.

परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या शुभ हस्ते फेडरेशनचे उद्घाटन झाले. यावेळी परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन नवनियुक्त उपाध्यक्ष हरिकिशन शर्मा, संचालक विजय जोशी, डॉ.प्रकाश आकोशे, किरण चव्हाण, संग्राम सोनी, केदार गजमल, प्रदीप राठोड, सौ.स्वाती ठोंबरे आदीसह परभणी जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना काका कोयटे म्हणाले की, “परभणी जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांची चळवळ पश्चिम व उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत काहीशी मागे असली, तरी मराठवाड्यातील काही पतसंस्था आजही राज्याला दिशा देणारे कार्य करीत आहेत. विशेषत: गोदावरी अर्बन सोसायटी आणि वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था यांसारख्या संस्था संपूर्ण महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला मार्गदर्शन करून चळवळ सुदृढ व बळकट करण्याचे काम करत आहेत.”

ते पुढे म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील सक्षम व आदर्श पतसंस्थांना एकत्रित करून परभणी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांची मोट बांधणे आवश्यक आहे. नव्याने स्थापन झालेल्या परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून संघटितपणे काम केल्यास जिल्ह्यातील चळवळीला नवे बळ मिळेल. अध्यक्ष रत्नदीप कळमकर यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशन प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी एकजूट दाखवून सहकार खात्यासमोर आपली सकारात्मक व सक्षम प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्य फेडरेशन परभणी जिल्हा फेडरेशनच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “परभणी जिल्ह्यात पतसंस्थांची संख्या तुलनेने कमी असली तरी कार्यरत असलेल्या संस्था अधिक कार्यक्षम, पारदर्शक व सक्षम कशा होतील यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. बंद पडलेल्या पतसंस्थांना पुन्हा ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्य फेडरेशन महत्त्वाची भूमिका बजावेल.” यासाठी सर्व पतसंस्थांनी राज्य फेडरेशनचे सभासदत्व स्वीकारून संघटित ताकद वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात परभणी जिल्हा पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष रत्नदीप कळमकर म्हणाले की, “पतसंस्था केवळ एक आर्थिक संस्था नसून हजारो कुटुंबांचा आधार आहे. हा आधार अधिक भक्कम करण्यासाठी तसेच येणारी आव्हाने पेलण्यासाठी आणि पतसंस्था चळवळ सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. परभणी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या समस्या, अपेक्षा व विकासाच्या दिशा यावर एकत्रितपणे काम करणार आहोत”

कार्यक्रमाला राज्य फेडरेशनचे संचालक सुदर्शन भालेराव, गोदावरी अर्बनचे कार्यकारी संचालक व राज्य फेडरेशन संचालक धनंजय तांबेकर, प्रसाद फलके, गिराम साहेब पाथरी, सुंदरलाल सावजी बँकेचे माजी अध्यक्ष प्रशांत सावजी कळमकर, श्री अष्टुरकर, दिलीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परभणी जिल्हा फेडरेशनचे संचालक सर्जेराव लहाने यांनी केले. उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष अशोक सेलगांवकर व किशोर देशपांडे यांनी मानले.

या उद्घाटन सोहळ्यामुळे परभणी जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या संघटनात्मक एकजुटीला नवे अधिष्ठान मिळाले असून मराठवाड्यातील पतसंस्था चळवळीला नव्या उमेदीने दिशा मिळेल, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.

1.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे