Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

विदर्भातील सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम करण्यात अध्यक्ष घाटे यांचा मोलाचा वाटा

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 4 2 3 6 3

विदर्भातील सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम करण्यात अध्यक्ष घाटे यांचा मोलाचा वाटा

नागपूर : विदर्भातील सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम करण्यासाठी नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी घाटे हे सातत्याने आणि जोमाने प्रयत्नशील असून त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील पतसंस्थांना नवे बळ मिळत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले. नागपूर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी राजेंद्र घाटे यांना भक्कम साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संताजी सांस्कृतिक सभागृह येथे २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित तीन दिवसीय महा प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

“बदलती अर्थव्यवस्था व सहकारी पतसंस्थांचे स्थान” या विषयावर मार्गदर्शन करताना काका कोयटे यांनी बदलत्या आर्थिक धोरणांच्या पार्श्वभूमीवर पतसंस्थांनी तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि सभासदभिमुख धोरणे स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. सहकाराच्या मूलभूत तत्वांवर ठाम राहून आधुनिकतेची कास धरणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या महा प्रशिक्षण कार्यशाळेला नागपूर विभागातील १६८ सहकारी पतसंस्थांचे तब्बल ४७५ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ही लक्षणीय उपस्थिती म्हणजे विदर्भातील सहकारी पतसंस्थांनी नागपूर जिल्हा फेडरेशनवर व्यक्त केलेला विश्वास असल्याचे मत गोदावरी अर्बन मल्टीस्टेट पतसंस्था अध्यक्षा सौ. राजश्री पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ जगदीश किल्लोळ तसेच धरमपेठ महिला को-ऑप. क्रेडिट सोसायटी संचालिका नीलिमाताई बावणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दोन्ही मान्यवरांनी सहकारी पतसंस्थांनी आर्थिक शिस्त, कायदेशीर सुसूत्रता आणि सभासदांप्रती उत्तरदायित्व यांचा समन्वय साधत कार्य केल्यास चळवळीला दीर्घकालीन बळकटी मिळेल, असे मत व्यक्त केले.

तसेच मनोगत व्यक्त करताना नाशिक जिल्हा विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी राज्य फेडरेशनच्या उपकार्याध्यक्षा सौ. अंजलीताई पाटील या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या संचालक पदाची निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. सर्व प्रतिनिधींनी आपल्या संस्थेच्या पॅनेलवरील कायदेशीर सल्लागार, मित्रपरिवार व नातेवाईकांना अंजलीताई पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करावे, अशी विनंती त्यांनी केली. त्यांच्या या आवाहनाला उपस्थित सर्व प्रतिनिधींनी हात उंचावून उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.

एकूणच, या महा प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून विदर्भातील सहकारी पतसंस्थांमध्ये संघटनात्मक बळकटी, समन्वय आणि भविष्यातील दिशा यांचा स्पष्ट संदेश देण्यात आला असून नागपूर जिल्हा फेडरेशनच्या नेतृत्वाखाली चळवळीला नवे उर्जितावस्था प्राप्त होत असल्याचे चित्र दिसून आले. प्रशिक्षण, संघटन आणि सक्षम नेतृत्व यांच्या बळावर विदर्भातील सहकारी पतसंस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि स्पर्धात्मक बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

1.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 3 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे