Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

विदर्भातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ‘श्री रंगनाथ स्वामी’चा गौरव – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 4 1 3 7 8

विदर्भातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ‘श्री रंगनाथ स्वामी’चा गौरव – काका कोयटे, अध्यक्ष

वणी (जि. यवतमाळ) : “वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ही केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे,” असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील पतसंस्थांचा भव्य सहकार मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या शुभ हस्ते वणी येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

प्रसंगी राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी सहकार कायद्यात आवश्यक असलेल्या बदलांविषयी सविस्तर मार्गदर्शन करत विदर्भातील पतसंस्थांसमोरील विविध अडचणींचा आढावा घेतला. सहकार कायद्यात सुचविण्यात आलेल्या दुरुस्तींना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने संमती दर्शविली.

तसेच ते पुढे म्हणाले की, ९०० कोटी रुपयांहून अधिक ठेवी संकलित करून आणि ९० हजारांपेक्षा जास्त सभासद नोंदवून श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेने ग्राहकांचा भक्कम विश्वास संपादन केला आहे. लवकरच सभासद संख्या एक लाखाच्या पुढे घेऊन जाईल असा विश्वास यावेळी काका कोयटे यांनी व्यक्त केला.

राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतिलाल शिंगी, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव व खजिनदार दादाराव तुपकर यांनीही मनोगत व्यक्त करत पतसंस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले. चेअरमन ॲड. देविदास काळे यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करून पारदर्शक कर्ज वाटप केल्यामुळे थकबाकीचे प्रमाण नगण्य असल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या वणी परिसरात कोळसा खाणींचे मोठे जाळे असून येथे कामगारांची लक्षणीय वस्ती आहे. या कामगारांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पतसंस्था करीत असल्याचे श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखडे यांनी सांगितले.

या वेळी गोदावरी मल्टीस्टेट पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय तांबेकर यांनीही सहकार चळवळीची ताकद, पारदर्शक व प्रामाणिक कामकाजाची गरज आणि संघटित प्रयत्नांतून होणारी वाढ यावर प्रभावी विवेचन केले.

वणी तालुका व परिसरातील सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार चळवळीच्या बळकटीसाठी हा मेळावा मार्गदर्शक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे