काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्रात सुवर्ण तारण व्यवसाय कार्यशाळा संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्रात सुवर्ण तारण व्यवसाय कार्यशाळा संपन्न

नागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींसाठी तीन दिवशीय ‘सुवर्ण तारण व्यवसाय कार्यशाळा’ आयोजन नागपूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या ‘काकासाहेब कोयटे सहकार प्रशिक्षण केंद्र’ या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या कार्यशाळेत सुवर्ण कर्ज, सुवर्ण गुंतवणूक, सुवर्ण तपासणी, सुवर्ण मूल्यमापन, अपहार व कृती, दस्तऐवज यांचे परिपूर्ण मार्गदर्शन सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना १५ व १६ मार्च रोजी करण्यात आले. तसेच १७ मार्च २०२५ रोजी यशस्वी संस्थेची कार्यपद्धती या पहिल्या सत्रा अंतर्गत अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेची यशोगाथा आणि नव्याने येऊ घातलेली आवाहने व पतसंस्था चळवळ या विषयावर समता पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

तर दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी ‘महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत सहकारी पतसंस्था चळवळीची भूमिका’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले.

या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालिका सौ नीलिमाताई बावणे, तज्ञ संचालक हरिभाऊ किरपाने, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र घाटे, उपाध्यक्ष मोरेश्वर मांगुळकर आदींसह नागपूर जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे १०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.



