Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना प्रवाहात आणून सक्षम करण्याचा संकल्प ; शहादामध्ये राज्य फेडरेशनच्या बैठकीत घेतला निर्णय

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

नंदुरबार जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना प्रवाहात आणून सक्षम करण्याचा संकल्प ;
शहादामध्ये राज्य फेडरेशनच्या बैठकीत घेतला निर्णय

शहादा, ता. ३० जुलै – नंदुरबार जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा ठराव शहादा येथे झालेल्या ‘सहकारी पतसंस्थांशी प्रत्यक्ष संवाद’ या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‘गप्पा सहकाराच्या…, विषय पतसंस्थांचा…’ या उपक्रमांतर्गत अतिथी हॉटेल शहादा येथे बैठक पार पडली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा नागरी ग्रामीण पगारदार, नोकर सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कांतीलाल टाटिया होते. प्रमुख उपस्थिती नंदुरबार जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष रमेशचंद्र जैन यांची होती. तर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीत बोलताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी स्पष्ट केले की, “नंदुरबार जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी राज्य फेडरेशनच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे. शहादा हे गाव गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने या ठिकाणच्या सहकारी पतसंस्थांचा लाभ सीमा भागातील नागरिकांनाही मिळावा, यासाठी सहकार खात्याकडे कायद्यात बदल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन प्रयत्नशील राहील,” असे त्यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असल्याने आदिवासी भागातील पतसंस्थांना अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन विशेष प्रयत्न करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या संवाद बैठकीत जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा शहादा येथे आयोजित केली जातील. राज्य फेडरेशनच्या विविध उपक्रमांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था सक्रीय सहभाग घेतील.पतसंस्था चळवळीला बळ देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा.असे नंदुरबार जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले.या बैठकीला नंदुरबार जिल्ह्यातील ५० सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी राज्य फेडरेशनचे स्वीकृत संचालक व महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक समीर जैन यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या कार्य तत्परतेचे कौतुक करताना काका कोयटे म्हणाले, “समीर जैन यांचा आदर्श सहकारी पतसंस्था चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांनी घ्यावा व सहकारी चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे न्यावी.”

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे