Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकार चळवळीत महिला सक्षमीकरणाचा जागर ; शिर्डीत ‘सहकार सम्राज्ञी’ व ‘सक्षम महिला, सक्षम सहकार’ पुरस्कारांचे भव्य वितरण

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

सहकार चळवळीत महिला सक्षमीकरणाचा जागर ; शिर्डीत ‘सहकार सम्राज्ञी’ व ‘सक्षम महिला, सक्षम सहकार’ पुरस्कारांचे भव्य वितरण

शिर्डी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित ‘सहकार उद्यमी’च्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिर्डी येथील सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिरात ‘सहकार सम्राज्ञी स्पर्धा २०२५’ आणि ‘सक्षम महिला, सक्षम सहकार पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करत त्यांच्या नेतृत्व गुणांना सन्मान मिळवून देणारा हा भव्य सोहळा ठरला असून या स्पर्धेतील यश प्राप्त महिलांना सहकार कायदा, कलम, सहकारी पतसंस्थांमधील कामकाज पद्धती आदी विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते.

कोपरगाव (अ.नगर) येथील प्रसिद्ध उद्योजिका व ‘अहिंसा हातकरघा’च्या संस्थापिका सौ. शोभना ठोळे यांच्या हस्ते आणि सहकार उद्यमी अध्यक्षा ॲड.अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील सहकारी पतसंस्था चळवळीत कार्यरत आणि प्रभावी योगदान देणाऱ्या महिलांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी प्रमुख पाहुणे शोभना ठोळे म्हणाल्या की, सहकार उद्यमीने पतसंस्था चळवळीतील महिलांना कामाच्या व्यापातून स्वतः मधील कला गुणांना वाव देण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबवत आहे. यामुळे महिलांना नेतृत्व व कर्तृत्व गुण विकसित करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आम्हाला देखील कोपरगाव शहरात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या सहकार्यामुळे अहिंसा हातकरघाच्या माध्यमातून व्यवसाय वाढीस बळ मिळाले आहे.

नांदेड येथील गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को – ऑप क्रेडिट सोसायटीच्या रुपाली नेरुरकर यांनी सहकार सम्राज्ञी स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळविला. महाड येथील शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या साक्षी पवार आणि गोदावरी अर्बन च्या राजेंद्र सिंघ – कामठेकर यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पुजा खडगी आणि नाशिक येथील कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वैभवी निकुंभ यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

तसेच पुरस्कार वितरणात विविध गटांतील महिलांना त्यांच्या कर्तृत्वाची दाद देण्यात आली. यामध्ये बेस्ट चेअरमन – १०, बेस्ट डायरेक्टर – ०६, बेस्ट मॅनेजर – २५, बेस्ट एस.आर.ओ. – ०२, बेस्ट कॅशियर – ०३, बेस्ट क्लार्क – ०६, बेस्ट प्युन – ०२, बेस्ट डेली कलेक्शन एजंट – ०४ अशा विविध विभागांतील ५८ महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

प्रास्ताविकात ॲड.अंजली पाटील म्हणाल्या की, राज्यभरातून स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा सोहळा सहकार क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा गौरव करणारा आणि त्यांच्या सक्षमीकरणाला बळ देणारा ठरला आहे.

अहिंसा हातमाग केंद्र आचार्य विद्यासागर यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने सुरू केलेले आहे याचा मुख्य उद्देश महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, विणकरी कलेला जागृत ठेवणे हा आहे. सिल्क व मटन टॅलोच्या साईजिंग मुळे होणाऱ्या हिंसेला आळा घालण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे यात पैसा कमविणे हा उद्देश नसून चांगली सुविधा उपलब्ध करून देणे हा असल्याचे कल्याणी गंगवाल यांनी सांगितले.

सहकार सम्राज्ञी स्पर्धेचे परीक्षक म्हणून सहकारी पतसंस्था चळवळीच्या तज्ञ सुचित्रा दिवाण, राज्य फेडरेशन संचालक भास्कर बांगर, समता महिला बचत गट अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे, ॲड.अंजली पाटील यांनी काम पाहिले. या सोहळ्याला फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, खजिनदार दादाराव तुपकर, स्थैर्य निधी संघ संचालिका सुशीलाताई नवले, ‘अहिंसा हातकरघा’च्या कार्यकारी संचालिका सौ.कल्याणी गंगवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य फेडरेशनच्या संचालिका सुरेखा लवांडे यांनी केले. समारोप ‘महाराष्ट्र गीत’ गाऊन करण्यात आला.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे