Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य फेडरेशनचे विचार मंथन शिबीर आणि प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

राज्य फेडरेशनचे विचार मंथन शिबीर आणि प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित २० व २१ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ येथे संपन्न झालेले विचार मंथन शिबिर सहकारी पतसंस्थांसाठी माईल स्टोन ठरले आहे. या विचार मंथन शिबिरात ७ गट तयार करून सहकारी पतसंस्थांच्या ७ प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. या विविध विषयाच्या अहवालाचे सादरीकरण कोअर कमिटीसमोर केले.

या कोअर कमिटीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकारी पतसंस्था चळवळीचे आधारस्तंभ व बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, बँकिंग तज्ञ गणेश निमकर, अप्पर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर यांचा समावेश होता.

या विचार मंथन चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या गटात सहभागी झालेल्या सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी तीन ते साडेतीन तास पतसंस्थांच्या विषयांवर चर्चा करून दुसऱ्या दिवशी कोअर कमिटी समोर अहवाल सादर करत या विविध विषयांवर झालेल्या चर्चेचा एक दस्तऐवज तयार करून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्याकडे सादर केला जाणार आहे. विचार मंथन शिबिराला उपस्थित सर्वच सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सहकार आयुक्त दीपकजी तावरे यांची ३ तास उपस्थिती लाभली. तसेच बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी, माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, बँकिंग तज्ञ गणेश निमकर यांनी देखील दोन दिवस उपस्थिती दर्शवली.

विचारमंथन शिबिराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधरजी अनास्कर यांनी तब्बल २ तास उपस्थित सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करत राज्य सहकारी बँक राज्यातील सहकारी पतसंस्थांचे पालकत्व स्वीकारणार असल्याचे मान्य केले. तसेच सहकार आयुक्त दीपक तावरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

माईल स्टोन ठरलेल्या विचार मंथन शिबिराबाबतच्या पतसंस्था प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया खालील प्रमाणे :

१) विचार मंथन शिबिरास उपस्थित सहकारी मित्रहो, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व उपस्थितीमुळे कार्यक्रम यशस्वी आणि भारदस्त झाला.सहकार खातेला एकीचे बळ दिसून आले. भाईंजी , काकाजी, निमकर साहेब कोतमिरे साहेब, अनास्कर साहेब, वाडेकर साहेब, यांनी केलेल्या सुचना फारच मोलाच्या ठरतील यात शंकाच नाही, मा. कोतमिरे साहेब व मा.अनास्कर साहेब यांनी आऊट ऑफ बॉक्स जावून पण नियमात बसवून कसे काम करावे हे फार खोचक पण वेचक भाषेत सांगितले आणि आम्हाला काम करणेस ऊर्जा देवून उत्साह वाढविला धन्यवाद…

आपण आज काही का होईना सर्वजण नवीन ज्ञान घेवुन निघालो आहोत व सहकार खात्याच्या सकारात्मक भुमिकेमुळे नक्कीच आपल्याला अपेक्षित असलेले बदल होतील.
राज फेडरेशन लवकरच झालेल्या चर्चेचा पाठपुरावा खात्याकडे करेल. सौ.लवांडे मॅडम व सहकारी स्टाफने केलेल्या सातत्यपुर्ण प्रयत्नाचेच हे यश आहे.
मा.काकांचे आणि सौ.लवांडे मॅडमचे खुप खुप आभार आणि धन्यवाद!
श्री यादव आणि माटेकर,
कराड मर्चंट, महिला मर्चंट परिवार , कराड

२) नमस्कार… जय सहकार,
काल रात्री उशिराने घरी सुखरूप पोहोचले. विचार मंथन बैठकीत अतिशय योग्य रीतीने मंथन होऊन अमृताचा कुंभ आपल्याला मिळाला असं मला वाटतंय. Mafcocs च्या सर्व संचालकांचे आणि विशेषतः सौ सुरेखा ताईंचे मनःपूर्वक आभार… काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संकल्पना अतिशय सुनियोजित पद्धतीने यशस्वी करणे यासाठी अतोनात मेहनत लागते.
काकाजी, भाईजी, माननीय कोतमिरे सर, वाडेकर सर, निमकर सर यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन खूप मोलाचं होतं, सर्वात पर्वणी म्हणजे अनास्कर सरांचं मार्गदर्शन.. 👍
सहकारावरच प्रेम त्यांच्या कार्यातून सतत दिसून येतं, आणि तशी ग्वाही त्यांनी काल आपल्याला दिली.. पुनश्च सर्व उपस्थितांचे आभार …
सौ.भारती पवार, वसई

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे